उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज, रविवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगी नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाट्याकडे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असून एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन हे देखील पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार सुरुवातीला देहरादूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली होती. मात्र काही वेळानं गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते, अशी माहिती डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी एएनआयच्या माधम्यातून दिली.
हेही वाचा