केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून वैदिक विधींसह भाविकांच्या उत्साहात केदारनाथ धामचे द्वार भाविकांसाठी खुले झाले आहेत. फुलांची सजावट करण्यात आली आहे.
केदारनाथमध्ये देशासह परदेशातून भाविक मोठा संख्येने दर्शनासाठी येत असतात. सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि आरोग्य सेवा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.