ताज्या बातम्या

चिमुकल्याच्या एका मागणीमुळे अंगणवाडीतील जेवणाचा मेन्यूच बदलला, शिक्षण विभागाची तारांबळ

केरळमधील लहानग्याच्या मागणीची आरोग्य, महिला व बाल कल्याणमंत्री वीणा जॉर्ज यांनी दखल घेतली

Published by : Team Lokshahi

सर्वच सरकारी शाळा, अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते. मुलांच्या वयोगटानुसार त्यांचे अन्न कसे असावे याबद्दलची आखणी सरकारकडून करण्यात आली आहे. तेलटक, तुपकट व तिखट असे पदार्थ लहान मुलांना दिले जात नाहीत. मात्र याच आहाराची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. केरळ राज्यातील एक प्रकार उघडकीस आला आहे. केरळमधील एका अंगणवाडीतील चिमुकल्याने आहारात बदल करावा अशी गोड मागणी केली आहे. पण नक्की हे का घडलं? याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊया.

केरळ येथील एका अंगणवाडीमध्ये एका लहान मुलाला उपमा खाल्ल्याने त्रास होऊ लागला. त्याचं डोकं भणभणू लागल्याने एक वेगळीच मागणी त्याने केली आहे. त्याच्या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. सदर मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण खात्याची एकच तारांबळ उडाली आहे. केरळ येथे राहणारा थरनूल एस शंकर उर्फ शंकूने आईकडे एक मागणी केली.

आईसमोर बोलताना रोज उपमा नको तर चिकन फ्राय किंवा बिर्याणी मिळावी असा तगादा लावला. शंकूच्या आईने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल आरोग्य, महिला व बाल कल्याणमंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वीणा जॉर्ज यांनी मुलांना अंगणवाडीमध्ये कोणते पदार्थ देण्यात येतात? याबद्दलचा तपास केला. तसेच अंगणवाड्यांमध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ खायला देण्यात येतात का? याबद्दलही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आहाराच्या प्रकारानंतर केरळ सरकारकडून अंगणवाड्यांचे रुपडं पालटण्यासाठी योजना आखण्यात येणार आहेत

केरळ येथील अंगणवाड्या आता स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंगणवाड्यांमध्ये मुलांना विश्रांतीकक्ष,अभ्यासासाठी स्वतंत्र खोली, बाग, खेळणी असे अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडी मदतनीस व शिक्षकांचे वेतनदेखील वाढवण्यात येणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये शंकूच्या आवडीच्या जेवणाचा प्रश्न सुटणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा