ताज्या बातम्या

Kesari 2 Box Office Collection : 'केसरी 2' चित्रपटातील कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना भावला; दुसऱ्याच दिवशी केली इतकी कमाई

अभिनेता अक्षय कुमार याचा 'केसरी चॅप्टर 2' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

Published by : Rashmi Mane

अभिनेता अक्षय कुमार याचा 'केसरी चॅप्टर 2' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटात अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'केसरी' या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 1000 स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवण्यात आला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाचा यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला 'छावा' चित्रपट दिर्घकाळ चालणारा चित्रपट ठरला आहे. 'केसरी 2' 'छावा' चित्रपटाला मागे टाकेल का, हे पाहण औस्तुक्याचं ठरणार आहे.

'केसरी चॅप्टर 2' ने बॉक्स ऑफिसवर 7.85 कोटींची कमाई केली आहे, जी चित्रपटाच्या शैलीचा विचार करता एक चांगली सुरुवात आहे. अक्षय कुमारने सी. शंकरन नायर आणि आर. माधवनने नेव्हिल मॅककिन्लेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्रिटिश सरकारविरुद्ध लढलेल्या सर्वात प्रदीर्घ कायदेशीर लढाईंपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर आलेला शेवटचा कोर्टरूम ड्रामा हा नानी निर्मित तेलुगू चित्रपट होता. 'कोर्ट : स्टेट व्हीएस ए नोबडी' ने बॉक्स ऑफिसवर 4 कोटींची कमाई केली आणि अक्षय कुमारच्या चित्रपटाने या ओपनिंगला मागे टाकले आहे. त्याच्या कोर्टरूम ड्रामाने 96% जास्त कमाई केली आहे!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा