Ketaki Chitale Post on Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू..."; पवारांना उद्देशून केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

केतकी चितळेने यावेळी अत्यंत अनादरकारक भाषेत लिखाण केलेलं आहे.

Published by : Sudhir Kakde

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. (Ketaki Chitale Facebook Post in Pawar)

केतकी चितळेने यावेळी लिहीताना सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहेत. केतकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये "तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll" अशा शब्दातील एक कविता शेअर केलेली आहे. अॅडव्होकेट नितीन भावेंनी ही कविता लिहील्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या पोस्टवरती सोशल मीडियावर आलेल्या कमेंटवर नजर टाकली असता, "केतकी ताई आपली लायकी आहे का बोलायची. पवारसाहेब कुठे आपण कुठं परत गुन्हा दाखल झाला की, रडू नका..." असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, "तिच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. कारण नाव कुठं घेतलंय यात. कविता लिहिनाराच वकील आहे." असं यामध्ये म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं