Ketaki Chitale
Ketaki Chitale Team Lokshahi
ताज्या बातम्या

केतकीला पोलिस कोठडी, वाचा, काय घडले न्यायालयात

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील (social media)आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना (sharad pawar)उद्देशून शेअर केलेल्या मजकूरवरुन केतकीला पोलिसांनी अटक केली. सकाळी केतकी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयात केतकीने वकील घेतला नाही. तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी सरकारी पक्षाने सांगितले की, केतकीने लिहिेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता आहे. तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.

युक्तीवाद करतांना केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. सोशल मीडियातून कॉपी करुन ती पोस्ट केली होती. समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी (Ketaki Chitale Police Custody) सुनावणी आली.

केतकीवर अनेक ठिकाणी गुन्हे

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा तिनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट केली आहे . या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्यात आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान केतकी चितळे हिचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. केतकी चितळे च्या वक्तव्याला फारस महत्व देण्याची गरज नाही त्या सोबत तिच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात, अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल