ताज्या बातम्या

खेलो इंडिया वूमन्स सिरीज- 2, जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला रौप्यपदक

सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवले असून गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज -2

Published by : shweta walge

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवले असून गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज -2 राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.

जुलै 2022 महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 ला अहमदाबाद येथे झालेल्या 18 वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज -1 राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याच बरोबर कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात पाच पदके पटकावली होती. त्यानंतर आता पुन्हा अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या राउंड मध्येही पूर्वाने आपला परफॉर्मन्स कायम राखत खेलो इंडिया वूमन्स सिरीज- 2 मध्ये ज्युनियर मुलींच्या गटात 200 मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. तसेच 400 मीटर फ्री -स्टाईल प्रकारातही चौथा क्रमांक पटकावला आहे.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये दहावीच्या शिक्षणा बरोबरच जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे. पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी