Solapur Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण; सोलापुरातील MIDC पोलिसात गुन्हा दाखल Solapur Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण; सोलापुरातील MIDC पोलिसात गुन्हा दाखल
ताज्या बातम्या

Solapur Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण; सोलापुरातील MIDC पोलिसात गुन्हा दाखल

सोलापूर अपहरण: भाजप आमदार पडळकरांचे कार्यकर्ते हांडे यांच्यावर हल्ला, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा आरोप.

Published by : Riddhi Vanne

Solapur Gopichand Padalkar On Rohit Pawar : सोलापूरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यावर फिल्मी पद्धतीने अपहरण करून मारहाणीची गंभीर घटना घडली आहे. शरणू हांडे असे जखमी कार्यकर्त्याचे नाव असून, सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन हांडेंची भेट घेतली आणि या प्रकरणामागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला.

शरणू हांडे यांनी सांगितले की, गुरुवारी काही व्यक्तींनी त्यांना घराजवळून पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत अपहरण केले. सात जणांच्या टोळीने कोयते, हॉकी स्टिक आणि तलवारीसह गाडीतच सतत मारहाण केली. या दरम्यान अपहरणकर्त्यांना आलेल्या व्हिडिओ कॉलवर रोहित पवार असल्याचा दावा हांडेंनी केला. त्या कॉलमध्ये पवारांनी माफी मागण्यास सांगितल्याचे, मात्र नकार दिल्यावर "त्याला पाहून घ्या" असे सांगितल्याचे हांडेंचे म्हणणे आहे. गटातील काही सदस्यांनी मारहाणीला विरोध दर्शवला आणि मधल्या प्रवासात उतरल्याचेही त्यांनी सांगितले.

पडळकर यांनी या घटनेत आरोपी अमित सुरवसेचा थेट सहभाग असल्याचे सांगितले. 2021 मध्ये सुरवसेने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली होती, मात्र त्यावेळी गंभीर गुन्हा नोंदवला गेला नव्हता. त्यांनी सुरवसे आणि पवार यांचे फोटो दाखवत, हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. तसेच, रोहित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एकजूट काही लोकांना मान्य नाही, आणि हांडेंना ठार मारण्याचा कट रचला गेला होता.

पोलिस तपासानुसार, 2021 मधील वादातून वैर वाढल्याने ही कारवाई झाली असावी. त्यावेळी हांडेंनी सुरवसेला मारहाण केली होती, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गुरुवारी सुरवसेने पुण्यातून कार भाड्याने घेऊन सोलापुरात येत हांडेंचे अपहरण केले. रात्री सुमारे 10 वाजता पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपींना अटक केली आणि जखमी हांडेंना रुग्णालयात दाखल केले.

सध्या हा प्रकरण राजकीय स्वरूप धारण करत असून, पडळकर आणि पवार यांच्यात वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू असून, आरोपींच्या पार्श्वभूमी आणि कटाच्या तपशीलांचा शोध घेतला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा