Kirit Somaiya -  Navneet Rana
Kirit Somaiya - Navneet Rana Team Lokshahi
ताज्या बातम्या

"पराग जोशींवर अन्याय..."; नवनीत राणांच्या लीलावतील फोटोग्राफी प्रकरणात सोमय्यांचे आरोप

Published by : Sudhir Kakde

मुंबई : शिवसेना विरुद्ध राणा वादात आता पुन्हा एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांना भायखळा तुरुंगातून बाहेर येताच लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी नवणीत राणांचा व्हायरल झालेला फोटो वादाचं कारण ठरला होता. एम.आर.आय स्कॅन रुम मधील राणांच्या फोटोवरुन शिवसेनेने (Shivsena) लीलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणात एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना आमदार मनिषा कायंदे या लीलावतीमध्ये पोहोचल्या होत्या. स्कॅन रुममध्ये अशा पद्धतीनं फोटोग्राफी का करु दिली असा सवाल पेडणेकर आणि कायंदे यांनी केला होता. त्यानंतर आता एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यावरुन आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेच्या दबावामुळे लीलावती हॉस्पिटलचे सुरक्षा प्रमुख पराग जोशी यांना हॉस्पिटल प्रशासनाने बडतर्फ केलं असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्दयावर बोलताना, शिवसेनेच्या दबावामुळे लीलावती हॉस्पिटलचे सुरक्षा प्रमुख पराग जोशी यांना हॉस्पिटल प्रशासनाने बडतर्फ केलं असा आरोप केला, पराग जोशी यांचा गुन्हा काय? मराठी माणसावर ठाकरे सरकारकडून सातत्याने अन्याय होतोय...पराग जोशी यांच्या पत्नीला न्याय हवा आहे असं अतुल भातखळकर म्हणाले.

किरीट सोमय्यांनी देखील यावरुन ठाकरे सरकारला घेरलं आहे. "शिवसेनेची धमकी, सुरक्षा प्रभारी पराग जोशी यांना रुग्णालय व्यवस्थापनाने बडतर्फ केले. ऐसी दादागिरी नाही चलेगी" असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...