ताज्या बातम्या

मुंबईच्या दिशेनं निघालेलं लाल वादळ शहापुरात धडकलं; आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होणार बैठक

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना यांनी हा लाँग मार्च काढला आहे.

शेतमालाला योग्य भाव नाही, जुनी पेन्शन, फ़ॉरेस्ट प्लॉट नावावर करणे असे अनेक प्रश्न घेऊन नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघालेला अखिल भारतीय किसान सभेला लॉंग मार्च आज शहापुरात धडकला असून दिवसभरात इगतपुरी कसारा घाट मार्गे प्रवास करत कळमगाव या ठिकाणी त्याचा मुक्काम आहे. या किसान सभेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करण्यासाठी सरकार चे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे व अतुल सावे यांच्या सोबत किसान सभेचे अजित नवले,डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, सुनील मालुसरे, उमेश देशमुख, अर्जुन आडे, हे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत 40 टक्के विषयावर चर्चा झाली असून अंतिम तोडगा मात्र निघाला नाही.

आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता विधान भवनात ही बैठक होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हा लॉंग मार्च विधानभावनार धडकणार असे माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष