ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याआधी सरकारनं उचलली पावलं; आज सभागृहात निवेदन देणार

शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत काल(16 मार्च) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांचा लाँग मार्चच्या शिष्टमंडळासोबत काल(16 मार्च) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आहे. शेतकरी शिष्टमंडळासोबत दोन तासांहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी मोर्चाचे नेते जे.पी. गावित यांनी सांगितले आहे. अनेक मागण्यांवर निर्णय झाले असून ते आज अधिवेशानात मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु, या निर्णयांचा जीआर निघून अंमलबजावणी न झाल्यास लाल वादळ मुंबईला धडक देईल, असा इशारा गावित यांनी दिला आहे.

मात्र, मागील 2018 व 2019 च्या आंदोलनावेळी फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याने आंदोलकांची निराशा झाली होती. यामुळे आज शासनाने कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन ते विधिमंडळ पटलावर मांडावेत व या सर्व चर्चेचे इतिवृत्त आमच्या हाती द्यावे. तसेच, याचे जीआर काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे आणि त्यांची अंमलबाजवणी सुरुवात करावी. याची खात्री पटल्यानंतरच आम्ही आंदोलन माघारी घेण्यात येईल. सोमवारपर्यंत जर शासनाने इतिवृत्त हाती दिले नाही, तर सर्व आंदोलन मुंबईच्या दिशेने धडक देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा