इराण-इस्रायल युद्धानंतर सराफ बाजारपेठेत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 97,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या 1 आठवड्यात सोन्याच्या किमतीत3400 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.
23 जून 2025 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,00,740 रुपये होती. त्याचप्रमाणे, आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 97,210 रुपये झाले आहे. यावरून 3440 रुपयांची घसरण दिसून येते म्हणजेच गेल्या 1 आठवड्यात सोने 3,430 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मुंबईमधील सोन्याचे दर :
मुंबईत आज 18 कॅरेट सोन्याचा दर 7,294 रुपये प्रति ग्रॅम आहे. काल बाजारात ते 7,307 रुपये प्रति ग्रॅम दर होता. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,915 रुपये आहे. काल बाजारात ते 8,930 रुपये प्रति ग्रॅम दराने उपलब्ध होते. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,726 रुपये आहे. काल बाजारात ते प्रति ग्रॅम 9,742 रुपये दराने उपलब्ध होते.
चांदीचे दर :
आज 30 जून 2025 रोजी चांदीचा भाव 1,07,700 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत चांदीचा दर 100 रुपयांनी कमी झाला आहे. सोन्यासोबतच चांदीमध्येही थोडी सुधारणा दिसून येत आहे.