कोलेस्ट्रॉल किती वाढले आहे आणि खरोखरच ते वाढलं आहे का? हे बघणं आजकाल आवश्यक झालं आहे. गेल्या मागील 25 वर्षापूर्वी कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी 250 पेक्षा कमी असली तरी ती सामान्य मानली जात होती. आज मात्र अनेकदा ते 200च्या खाली असते.तर काही ठिकाणी दीडशेच्या खाली पाहिजे असा आग्रह धरलेला दिसतो. ही घसरण अशीच सुरु राहिली तर एक दिवस जगातल्या सर्वांनाच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषध घ्यावी लागणार की काय? असा मनात आल्याशिवाय राहत नाही.
परमेश्वर किंवा निसर्गाने आपल्या शरीरामध्ये कोणतीही गोष्ट अनावश्यक दिलेली नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रने प्रत्येक पेशीचे पडदा तयार होण्यासाठी, शरीरातले इस्ट्रोजेन(estrogen), टेस्टोस्टेरॉन (testesteron) सारखे अत्यंत महत्त्वाचे हार्मोन्स तयार होतात. इतकेच नाहीतर, पचन क्रियेची कार्यक्षमता वाढण्यासाठी कॉलेस्ट्रोलची गरज असते असं सिद्ध झालेले आहे. त्यामुळे शरीरामध्ये योग्य प्रमाणात कॉलेस्ट्रोल असणं आवश्यक आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून सांगायचं झाले तर, अन्न पचनाचा आणि कोलेस्ट्रॉलचा खूप जवळचा संबध असतो. प्रकृतीला अनुकूल असा आहार घेतला पाहिजे , रोज योगासने करावी , चालायला जाणं यासाठी वेळ काढला पाहिजे, घरी बनवलेलं साजूक तूप पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान चार ते पाच चमचे इतकं सेवन केलं, तर लिपिड प्रोफाइल टेस्ट (Lipid Profile Test) मधल्या सर्वमूल्ये सामान्य येतात. शरीरातील कॉलेस्ट्रोल औषध न घेता कमी करता येऊ शकते.
शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी नेमंक काय करावे?
सांगयचं झाले तर, दुपारचे जेवण 12 च्या आसपास करावा. आहारामध्ये एक चपाती, मुग किंवा तुरीची आमटी, सफेद भात,वेलावर येणारी फळभाजी, मूग, मटकी, मसूर यापैकी एखादी उसळ, ताजं आणि गोड ताक अशा स्वरुपात आहार असावा. आहारात साजूक तूपाचा विशेष समावेश करावा. संध्याकाळाचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर करावे. त्यामध्ये भाकरी, भाजी आणि खिचडी किंवा साधा वरणभात त्याचबरोबर सूप किंवा पुलाव अशा गोष्टीचा समावेश असावा.
कॉलेस्ट्रोल वाढण्याची कारणे
सध्या बाजारात तयार अन्न (Readymade packed food) पदार्थाचे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पनीर, दही, चीज, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. असे केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रोल वाढत नाही.