आजचा संघर्ष या उद्याच्या यशाची पाऊलखुणा असतात. शहरापासून दूर गावाखेड्यात आलेल्या तरुणांसाठी हा संघर्ष खूप मोठा असतो. प्रामणिकपणे केलेला संघर्ष ,हे कधीच वाया जात नाही. बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने सिद्ध करुन दाखवले आहे. युपीएसच्या परीक्षेत तो देशात 551वी रॅंक मिळवला आहे. यूपीएससीचा निकाल लागला. बिरदेव पास झाला. त्यावेळेस तो त्यांच्या कुटुंबासोबत मेंढ्या चारायला गेला होता. कोल्हापूरचा धनगर समाजाचा तरुण आयपीसएस झाल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे.
बिरदेव यांनी युपीएससी परीक्षेत 551 वा क्रमांक मिळवत त्यांने आयपीएस बनवण्याचा प्रवास पूर्ण केला. बिरदेव हा प्रवास सोपा नव्हता. याआधी त्याने दोनदा परीक्षा दिली होती. पण यात त्याला यश मिळालं नव्हतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नांच्या कष्टाचं चीज झाले होते. वडिलांनी फेटा बांधून बिरदेवचं अभिनंदन केलं.
उच्च शिक्षणानंतर बिरदेव यूपीएससी तयारीसाठी पुण्यामध्ये गेला होता. तिथे सदाशिव पेठेमध्ये त्याने अभ्यास सुरु केला. सलग २ परीक्षांमध्ये त्याला अपयश आले. परंतू त्याने हार मानली नाही. गेल्यावर्षी तिसरा अटेम्प्ट त्याने दिला. यानंतर बिरदेव देशात 551 वा रॅंक मिळवून उत्तीर्ण झाला. बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी ठरला आहे.