थोडक्यात
कोल्हापुरात सहा नृत्यांगणाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न
महिला सुधारगृहात घडलेल्या घटनेने खळबळ
आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण गुलदस्त्यात
Kolhapur Crime Mystery in Kolhapur as six Female Performers Try to End lives : कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा डान्सर तरुणींनी एकाच वेळी एकत्रित आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वता:ची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकत्रित आत्महत्येच्या प्रयत्नाने कोल्हापुरात चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच त्या सहाजणींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेय
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरामधील कात्यायनी परिसरातील एका फार्महाऊसवर धाड टाकली होती. त्या फार्महाऊसवर एका पार्टीत डान्स करताना त्या आढळल्या होत्या. त्यावेळी त्यांना ताब्यात घेतले होते. या नैराश्यातून त्यांनी असे टोकाचं उचलल्या संशय व्यक्त केला जात आहे.