ताज्या बातम्या

शाळेतून घरी येताच त्यानं आईला प्रियकरासोबत बेडरुमध्ये पाहिलं, बिथरलेल्या दोघांनी...

Kolhapur पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, प्रियकरासह महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

Published by : Sudhir Kakde

कोल्हापूर | मुलाने आईला प्रियकरासोबत बेडरूममध्ये पाहिल्याने मुलाला विष घालून ठार मारण्याची धमकी देत अघोरी कृत्य करायला भाग पाडणाऱ्या प्रियकराला आणि आईला पोलिसांनी अटक केलीय. याबाबत 15 वर्षीय मुलाने जुना राजवाडा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. नेहमी शाळेत त्याला आई घ्यायला जायची मात्र तो शाळेतून नेमका लवकर घरी आला आणि त्याला आईचे प्रियकरासोबत बेडरूम मधले दृश्य निदर्शनास आले. त्यावेळी बिथरलेल्या या प्रेमीयुगुलाने मुलाला शाळेत घ्यायला येतो म्हणून सांगितले असतानाही का एकटा घरी आला म्हणत मारहाण केली. तर त्याला आणि वडिलांना विष घालून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. एवढंच नाही तर त्याच्याकडून अघोरी कृत्यही आईने करून घेतले. त्यामूळे घाबरलेल्या मुलाने याची वडिलांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर मनोज पवारसह मुलाच्या आईला अटक केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा