Kolhapur News Kolhapur News
ताज्या बातम्या

Kolhapur News : सोशल मीडियाची मैत्री अन् घरदाराला रामराम; हातकणंगलेत नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील 14 वर्षांची मुलगी आभासी जगातील ओळखीच्या विश्वासावर थेट उत्तर प्रदेशकडे निघाली. मात्र तिचा हा निर्णय मध्येच उधळला गेला.

Published by : Riddhi Vanne

सोशल मीडियावर ओळख वाढत गेली आणि त्या ओळखीचं रूपांतर भावनिक गुंतवणुकीत झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील 14 वर्षांची मुलगी आभासी जगातील ओळखीच्या विश्वासावर थेट उत्तर प्रदेशकडे निघाली. मात्र तिचा हा निर्णय मध्येच उधळला गेला.

सोमवारी सकाळी ती घरातून निघून गेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. तपास सुरू करत पोलिसांनी रेल्वे मार्गावर लक्ष केंद्रित केलं. कोयना एक्सप्रेसने प्रवास करत असताना ही मुलगी लोणंद रेल्वे स्थानकाजवळ आढळून आली.

वेळीच कारवाई झाल्यामुळे मुलगी सुरक्षितपणे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. या घटनेमुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे—सोशल मीडियावरची ओळख नेहमीच सुरक्षित असेलच असं नाही. विशेषतः अल्पवयीन मुलांनी आणि पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

थोडक्यात

  • सोशल मीडियावर ओळख वाढत गेली

  • ओळखीचे रूपांतर भावनिक गुंतवणुकीत झाले

  • कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील 14 वर्षांची मुलगी

  • आभासी जगातील ओळखीच्या विश्वासावर घेतला मोठा निर्णय

  • थेट उत्तर प्रदेशकडे निघाली मुलगी

  • मात्र प्रवासादरम्यानच हा निर्णय उधळला गेला

  • वेळेत हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा