Kolhapuri Chappal : महाराष्ट्राची कोल्हापुरची थान म्हणजे कोल्हापुरची चप्पल आहे. पण आता ही चप्पल इटलीतील मिलान येथे झालेल्या फॅशन वीकमध्ये आपल्या कलेक्शनमध्ये भारतीय कोल्हापुरी चप्पलला जागतिक व्यासपीठावर झळकवल्याने फॅशन जगतात एकच चर्चा रंगली आहे. पारंपरिक भारतीय लेदर चप्पल, जी कोल्हापूरमध्ये हाताने तयार केली जाते, ती आता इटालियन लक्झरी शोचा केंद्रबिंदू ठरली. मात्र या शोमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या नावाचा उल्लेख न केल्याने कोल्हापुरी कारागिरांनी सोशल मीडियावर आपली नाराजगी व्यक्त केली आहे.