ताज्या बातम्या

Kolkata Rape- Murder Case: मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.

Published by : shweta walge

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी देशभरात निर्देशनेही केली जात आहेत. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतली असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा