राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी काल मतदान शांततेत पार पडले. 15 जानेवारी रोजी सुमारे 29 महानगरपालिकांमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला. आज, 16 जानेवारीच्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीने जोरदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भिवंडीतील निकालांनी राजकीय चित्र वेगळेच वळण घेतले आहे.
दरम्यान, जळगावमध्ये भाजपाच्या आशाबाई रमेश पाटील यांनी विजय संपादन केला असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.