MHADA  MHADA
ताज्या बातम्या

MHADA : म्हाडाचे घर खरेदी करणे झाले झटपट; कोकण मंडळ थेट देणार 12 हजार घरांच्या विक्रीसाठी गृहकर्जाची सोय

म्हाडाच्या कोकण विभागात अजूनही सुमारे 12 हजार घरे न विक्रीत पडून आहेत. ही घरे लवकरात लवकर विकली जावीत यासाठी म्हाडाने आता नवा निर्णय घेतला आहे.

Published by : Riddhi Vanne

म्हाडाच्या कोकण विभागात अजूनही सुमारे 12 हजार घरे न विक्रीत पडून आहेत. ही घरे लवकरात लवकर विकली जावीत यासाठी म्हाडाने आता नवा निर्णय घेतला आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना सहजपणे गृहकर्ज मिळावे, यासाठी एका खास संस्थेची गृहकर्ज मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना थेट बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

कोकण मंडळाने पुढील सहा महिन्यांत सर्व रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ‘बुक माय होम’सारख्या योजनांसोबतच आता गृहकर्ज सल्लागाराची मदत घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे अधिकाधिक लोक घर खरेदीकडे वळतील, असा विश्वास मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण विभागातील अनेक ठिकाणची घरे अद्यापही खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. घरांचे दर जास्त असणे, सोयी-सुविधांचा अभाव किंवा प्रकल्पांचे ठिकाण योग्य नसणे, अशा कारणांमुळे नागरिकांनी या घरांकडे फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे याआधी जवळपास 20 हजार घरे रिक्त राहिली होती आणि मंडळाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही परिस्थिती बदलण्यासाठी म्हाडाने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर घरे विक्रीस काढली, तसेच खासगी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. आता गृहकर्ज सहज उपलब्ध होणार असल्याने कोकण मंडळातील घरांची विक्री वेग घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात

  • म्हाडाच्या कोकण विभागात सुमारे 12,000 घरे अद्याप विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

  • ही घरे लवकरात लवकर विकली जावीत, यासाठी म्हाडाने नवीन निर्णय घेतला आहे.

  • घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी गृहकर्ज मिळवणे सोपे होईल.

  • एका खास संस्थेला गृहकर्ज मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आले आहे.

  • नागरिकांना थेट बँकांमध्ये जाऊन कर्जासाठी फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

  • हा निर्णय घर खरेदी प्रक्रियेला सुलभ आणि जलद बनवण्यास मदत करेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा