ताज्या बातम्या

कोकणातील रिफायनरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा बारसू, सोलगावला मिळाला हिरवा कंदील!

कोकणातल्या नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगाव इथं रिफायनरी वरुन चांगल्याच चर्चा सुरु होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणातल्या नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगाव इथं रिफायनरी वरुन चांगल्याच चर्चा सुरु होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून परवानगी मिळाली आहे.

रिफायनरीची क्षमता कमी करून कोकणाच्या आर्थिक विकासामध्ये बाधा नको. नाणारमध्ये मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेची अर्थात 60 मिलियन मॅट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभी करावी. असे मतं नाणारला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आहे.

कोकणात 60 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारणं शक्य आहे असं सांगितलं जात आहे. त्याचे उत्तर म्हणजे नाणार. नाणार या ठिकाणची रिफायनरी रद्द झालेली असली तरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा आणि पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरीची क्षमता ही 60 मिलियन मेट्रिक टन इतकी होती. पण त्याच वेळेला बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही 20 मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया