ताज्या बातम्या

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मला २० हजारापेक्षा जास्त मतं मिळतील; महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विश्वास

Published by : Siddhi Naringrekar

मयुरेश जाधव, बदलापूर

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून यामध्ये मला २० हजारापेक्षा जास्त मतं मिळतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. सोबतच यंदा पहिल्यांदाच पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच निर्णय लागेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप शिवसेना आरपीआय महायुतीकडून ज्ञानेश्वर म्हात्रे हे रिंगणात आहेत. आज मतमोजणी केंद्रावर रवाना होण्यापूर्वी बदलापूरमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी त्यांचं औक्षण केलं आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यंदा निवडणुकीत ३५ हजार मतदान झालं असून त्यापैकी २० हजारापेक्षाही जास्त पहिल्या पसंतीची मतं मला मिळतील आणि पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच माझा विजय होईल, असा विश्वास यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला. तसंच म्हात्रे घराण्यात एक तरी आमदार असावा, असं आमचं स्वप्न होतं. आज यानिमित्ताने ते स्वप्न देखील पूर्ण होईल, असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे

LSG VS KKR: लखनौचा दुसऱ्यांदा पराभव; कोलकाता नाईट रायडर्स 98 धावांनी दमदार विजयी

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात