संपूर्ण देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वदेशी सोशल मीडिया अॅप KOO नेही या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दिनानिमित्त विशेष मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून #nayebharatkasapna 'नए भारत का सपना' हा हॅशटॅग सुरू करण्यात आला आहे. हा हॅशटॅग वापरून मान्यवरांनी नव्या भारतासाठी त्यांचे संकल्प जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. #nayebharatkasapna अभियानाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने केली होती. टायगर श्रॉफ आणि अन्य मान्यवरही या अभियानात सामील झाले आहेत.
बॉलीवूडचा आघाडीचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा टायगर श्रॉफ याने भारताचा आपला सोशल मीडिया मंच 'कू' (KOO) वर #nayebharatkasapna हा हॅशटॅग वापरत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यामध्ये त्याने म्हटलंय की, 'तुम्ही आम्ही सगळेजण नव्या वर्षानिमित्त संकल्प करत असतो. मात्र यंदा आपण सगळे मिळून देशासाठी एक संकल्प करूया. नव्या भारताचे स्वप्न आहे, की अधिकाधिक झाडे लावली जावी. तुम्हीही वृक्षारोपण करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपणा सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा'
अभिनेता आणि लेखक पियूष मिश्रा हेदेखील या मोहीमेत सामील झाले असून त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील सगळ्या नागरिकांना सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी देशवासीयांना आवाहन करताना म्हटलंय, की
#आज़ादीकाअमृत_महोत्सव_2022
'नमस्कार,
आपण सगळेजण यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करून देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सजग नागरीक होण्याच्या माझ्या निश्चयात सगळेजण सहभागी होऊ शकता.'