ताज्या बातम्या

कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Published by : Siddhi Naringrekar

कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे.

1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अनेक वाहनांची जाळपोळ झाली, मालमत्तेचं नुकसान झालं. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते.

कोरेगाव भीमामध्ये 2018 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

या प्रकरणाची 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकसी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर