Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam First Week Box Office Collection : महाराष्ट्रात मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस चिंतेची होत चालली आहे. अनेक पालक मुलांना इंग्रजी, विशेषतः आंतरराष्ट्रीय शाळांकडे वळवत असल्याने मराठी माध्यम हळूहळू मागे पडताना दिसत आहे. याच वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रभावी कलाकार, हेमंत ढोमे यांचे संवेदनशील दिग्दर्शन आणि मराठी शिक्षणव्यवस्थेवर नेमके बोट ठेवणारा विषय यामुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. हर्ष-विजय यांच्या संगीताने कथेला अधिक भावनिक खोली दिली आहे.
चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेषतः मराठी शाळेत शिकलेले प्रेक्षक या कथेशी स्वतःला जोडताना दिसत आहेत. गाणी आधीच लोकप्रिय ठरली होती आणि आता सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न मिळवले आहे.
राज्यभरातील शाळांमध्ये जाऊन केलेले वेगळ्या पद्धतीचे प्रमोशन आणि शालेय आठवणींना उजाळा देणारा हा सिनेमा अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत पाहायला जात आहेत. मराठी शाळा, शिक्षक आणि शिक्षणाचं मोल पुन्हा आठवण करून देणारा हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.