ताज्या बातम्या

India vs Pakistan War : वाशिमच्या जवानाचं देशप्रेम; लग्नांच्या दोन दिवसानंतर लगेचच सीमेवर रवाना

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र, कृष्णा राजू अंभोरे, याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल दिली आहे.

Published by : Rashmi Mane

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र, कृष्णा राजू अंभोरे, याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. नुकतेच त्यानं लग्नगाठ बांधली होती. परंतु लग्नाच्या केवळ दोनच दिवसानंतर सैन्यदलाकडून कर्तव्याची हाक आली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने देशसेवेसाठी तत्काळ प्रयाण केले. नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कृष्णाच्या डोळ्यांत केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. भावनांच्या काठावर उभं राहून, तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

आज , दुपारी २.३० वाजता तो उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी "जय जवान", "वंदे मातरम्" अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. "देश आधी, बाकी नंतर" हे त्याने आपल्या कृतिशील निर्णयातून सिद्ध केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते