Ladakh, Army Vehicle Accident  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ladakh : लष्करी वाहन दरीत कोसळून 7 जवानांचा मृत्यू

Ladakh Army Vehicle Accident : या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत.

Published by : Sudhir Kakde

श्रीनगर : लडाखमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळून 7 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. श्योक नदीजवळून जाताना वाहन घसरून नदीत कोसळल्याने ही घटना घडली आहे. 7 जवानांच्या मृत्यूव्यतिरीक्त यामध्ये काही जण जखमी असल्याची देखील माहिती मिळतेय. लडाखच्या तुरतुक परिसरातील श्योक नदीत हे वाहन कोसळलं आहे. यावेळी वाहनातून 26 जवान प्रवास करत होते. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता लडाखमधील परतापूरमधून 26 जवानांना घेऊन एक गाडी हनिफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे रवाना झाली. थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर सैनिकांना घेऊन जाणारं वाहन रस्त्यावरून घसरलं आणि 50 ते 60 फूट खोल श्योक नदीत कोसळलं.

प्राथमिक माहितीनुसार निसरड्या रस्त्यामुळे वाहन दरीत कोसळलं अशी शक्यता आहे. या घटनेनंतर जखमी जवानांना हवाई दलाच्या मदतीने जवळच्या लष्करी रुग्णालयात हालवण्यात आल्याची माहिती समोर मिळते आहे. या घटनेनं सध्या देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा