महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पुर्ण केली असून त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरवण्यात आले आहे. त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र, अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे. या योजनेच्या पैशातून ज्या महिला व्यवसाय करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही.
लाडकी बहिण योजना कधी सुरु झाली
28 जून 2024 रोजी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे 2.5 कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर 13 लाखांवर 3 महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. 2.47 कोटी महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे