ताज्या बातम्या

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणूक लढवण्याची "या" पक्षाने दिली ऑफर

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आलं आहे. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान या गँगचे प्रमुख लक्ष्य असल्याचे पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खान यांच्या जवळचे आणि जिवलग मित्र असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आणि याची कुबूली लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच एका पक्षाचे अजब विधान समोर आले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स यांना पत्र लिहून महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली आहे. तर आता यावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा