नाशिकच्या सभेनंतर सदावर्तेंची ठाकरेबंधूच्या सभेवर टीका केली आहे म्हणाले की, मुंबईतील मतदार म्हणून बोलताना एका नागरिकाने आगामी राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले आहे. ११ जानेवारी रोजी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार असून, या सभेभोवती आता वाद निर्माण झाला आहे. या सभेला विरोध करत गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. सभेमुळे ध्वनी प्रदूषण होणार असल्याची तक्रार करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन होत असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच सदावर्तेंनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली म्हणाले की, 'राज ठाकरेंच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे.' नाशिकच्या सभेनंतर सदावर्तेंची टीका केली. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, मग ते कोणतेही मोठे नेते असोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण आणि कायदा यावर भाष्य करताना सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले पाहिजे, अन्यथा ती अवमानाची बाब ठरेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या सभेतून ते कोणता संदेश देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही बहुचर्चित सभा 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थावर पार पडणार आहे.