थोडक्यात
आज कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय होण्याची शक्यता
दिल्लीत आज कॉंग्रेसची बैठक पार पडणार
आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत आज काँग्रेसची बैठक पार पडणार आहे.
यातच आज काँग्रेसला नवीन मुख्यालय मिळणार आहे. "इंदिरा गांधी भवन" असं या नव्या मुख्यालयाचं नाव असणार असून या उद्घाटनाला आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विविध राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडण्याची शक्यता असून या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.