ताज्या बातम्या

आज विधान परिषदेची निवडणूक; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया म्हणाले...

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हरणारा 12वा उमेदवार कोण असणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसची मतं ठाम आहेत. पक्की आहेत. काही अफवा उठवल्या जातात त्यात काही तथ्य नाही. आमचे मतदान व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान