थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने चांगलंच धुमाकूळ घातला आहे.प्रशासनाने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवावी , या मागणीसाठी आज पुणे बायपास रस्त्यावर नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.
सकाळी 10 वाजता हा रास्तारोको होईल.खारे कर्जुने, इसळक, निंबळक गावातील नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. इसळक गावात 10 वर्षाच्या राजवीर कोतकर या मुलावर काल बिबट्याने हल्ला केला होता.या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झालाय.तर तीन दिवसांपूर्वी खारे कर्जुने येथे पाच वर्षीय रियांका पवार या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.बिबट्याकडून सातत्याने लहान मुलांवर हल्ले होत आहे.त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भागातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात.
नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय.त्यामुळं नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.
थोडक्यात
अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ ...
बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या ..
.गावकऱ्यांची मागणी ...
नागरिक करणार रास्ता रोको आंदोलन