थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या बिबट्याचा संचार वाढत असून हल्ले वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याचा दिवसेंदिवस वाढणारा संचार नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. तारेच्या कंपाउंड वरून बिबट्या उडी मारताना काही नागरिकांनी बघितल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. कधी भक्ष्याच्या शोधार्थ तर कधी तहान भागविण्यासाठी बिबटे बाहेर पडतात. अशावेळी रात्रीच्या सुमारास तर कधी दिवसाढवळ्या देखील बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण असते.
थोडक्यात
देवळाली कॅम्पचा लवीत परिसरात बिबट्याच दर्शन
काही नागरिकांनी कॅमेरात केले बिबट्याचे चित्रीकरण
तारेच्या कंपाउंड वरून बिबट्या उडी मारताना काही नागरिकांनी बघितल्याची माहिती
वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू