police Team Lokshahi
ताज्या बातम्या

सुट्टीसाठी कायपण! पोलीस कर्मचाऱ्याचे हटके स्टाईलमध्ये पत्र, वरिष्ठही चक्रावले

पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : सुट्टीसाठी कोण काय करेल हे आता सांगता येत नाही. पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेही (Police Constable) सुट्टी मिळावी यासाठी हटके स्टाईलमध्ये पत्र लिहिले आहे. हे पत्र पाहून वरिष्ठही चक्रावून गेले आहेत. या पत्राचा फोटो आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

खडक पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने साप्ताहिक सुट्टीसह आणखी एक ज्यादा सुट्टी मिळावी म्हणून अनोख्या स्टाईलने पत्र लिहिले आहे. आपल्या सहकाऱ्याला मासे घेऊन यायचे आहे हे कारण देत सुट्टी मिळण्याबाबत वरिष्ठांना पत्र लिहले आहे. या पत्राची आता सर्वत्रच चर्चा सुरू झाली असून आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर यावर नेटकरीही आपल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

माझी साप्तहिक सुट्टी दिनांक 29 मे रोजी असून माझे मुळ गाव वाशींबे जि. सोलापूर येथून खडक पो.स्टेशनचे माझे सहकारी यांच्यासाठी चिलापी आणि रव मासे घेऊन येणे असल्याने मला दिनांक 29 मे रोजीची सुट्टी जोडून दिनांक 30 मे रोजीची एक दिवस किरकोळ रजा मुख्यावय सोडण्याचे परवानगी मिळण्यास विनंती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा