ताज्या बातम्या

अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक करणार नाही, LIC चा मोठा निर्णय

भारतीय आयुर्विमा महामंडळानं सध्यातरी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय आयुर्विमा महामंडळानं सध्यातरी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीने अदानींना धक्काच दिला आहे. अशी माहिती एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांनी सांगिले की, आम्ही काहीही करण्याचा विचार करत नाही. अल्पावधीतच शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे LIC नं स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत त्यांनी अदानी समूहातील गुंतवणूक विकायची किंवा त्यासंबंधित कोणतेही पाऊल उचलायचे, असा निर्णय घेणं योग्य नाही. तसेच ते म्हणाले, 'मला निर्णय घ्यायचाय की, नाही? हे ठरवण्यासाठीच माझ्याकडे खूप कमी वेळ होता.' असे एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार सांगितले आहे.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर, अदानी समूहाला मोठे धक्के बसत आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीनं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.हिंडेनबर्गचे आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपल्या बचावात निर्णय घेणं LIC ला अत्यंत गरजेचं होतं.

अदानी समुहाच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणं एलआयसीला खूप महागात पडलं आहे.हिंडनबर्ग रिसर्च या अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्मच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एलआयसीनं गेल्या अनेक वर्षांत अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा