LIC ipo Team Lokshahi
ताज्या बातम्या

LIC IPO मध्ये घसरण, आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

घसरणीनंतर काही प्रमाणत सुधारणा

Published by : Team Lokshahi

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC IPO) प्रारंभिक समभाग विक्रीनंतर आज शेअर बाजारात (Listing Gain) नोंदणी झाली. परंतु आयपीओची नोंदणी घसरणीनंतर झाली. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना अपेक्षा असलेल्या या शेअरमधून नुकसान झाले.

LIC चे शेअर्स BSE वर सुमारे 9 टक्क्यांनी खाली 867 रुपयांवर लिस्ट झाला. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम एलआयसी आयपीओच्या लिस्टवर झाला. या परिस्थितीत देशातील सर्वात मोठ्या IPO मधून गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर एलआयसीचे मार्केट कॅप 5.48 लाख कोटी रुपये होते.

गुंतवणूकदारांनी काय करावे

घसरणीच्या नोंदणीनंतर बाजारा LIC च्या शेअर्समध्ये सुधारणाही होत आहे. आता तज्ज्ञांच्या मते, बाजारातील सुधारणेमुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. मात्र त्यासाठी गुंतवणूकदारांना प्रतीक्षा करावी लागेल. सध्या तरी गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.

एलआयसी आयपीओ 6 दिवस खुला होता. गुंतवणूकदारांकडून LIC च्या IPO ला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला. LIC IPO ची किंमत 902 ते 949 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. सवलतीत सूचीबद्ध होण्याचे संकेत आधीच होते. कारण LIC IPO प्रीमियम (LIC IPO GMP) ग्रे मार्केटमध्ये सतत घसरत होता.

आयपीओच्या आधारे एलआयसीचे मूल्यांकन रुपये सहा लाख कोटी होते. एलआयसी आयपीओतून केंद्र 63 हजार कोटी ते 65 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. एलआयसी आयपीओचा विस्तार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा