त्वचेची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यासाठी बाजारातून विविध प्रकारच्या आणि महागड्या क्रीमदेखील विकत घेतात. पण या खर्चीक असणारी उत्पादने प्रत्येकवेळी लागू होतीलच असे नाही. मग यावर आपल्या घरातीलच काही गोष्टी आशा आहेत ज्या तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतील. त्यातील एक म्हणजे नारळाचे तेल. नारळाच्या तेलाचा वापार केसांसाठी केला जातो. पण हे तेल त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. रासायनिक उत्पादनांपेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. पण याचा वापर कसा करावा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. जाणून घेऊया नारळाच्या तेलाचा योग्य वापर कसा करावा त्याबद्दल.
रात्री वापर करावा
रात्रीच्या वेळेस तुमच्या त्वचेवर प्रक्रिया होत असते. याचवेळी जर चेहऱ्यावर नारळाचं तेल लावलं तर त्यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते त्यामुळे त्वचेवर तेजदेखील येते.
त्वचा मऊ होते
नारळाच्या तेलात पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ई सारखे पोषक घटक असतात. तेलामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसेच त्वचा खूप सौम्य होते. याचा फायदा थंडी आणि उन्हाळ्यात अधिक होतो.
सुरकुत्या कमी होतात
चेहऱ्यावरील येणाऱ्या सुरकुत्या ही अनेकदा मोठी समस्या असते. यासाठी नारळाचे तेल अत्यंत गुणकारी ठरते. तेलातील अॅंटी-ऑक्सिडन्स त्वचेवर येणारे वृद्धत्व कमी करतात.
तेलाचा वापर कसा करावा ?
सुरवातीला चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर कोरड्या टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर थोडेसे तेल किंचित कोमट करुन तेल चेहऱ्यावर लावा. तेल लावताना हलक्या हाताने मालीश करा. यामुळे त्वचा तेल शोषून घेते. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवणे खूप फायदेशीर होते. सकाळी उठल्यावर सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.