युरोपमधील अनेक देशांप्रमाणेच आता पोर्तुगालनेही सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पोर्तुगालच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं असून लवकरच ते कायद्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यावर पोर्तुगालही ऑस्ट्रिया, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड यांच्यासारख्या देशांच्या यादीत सामील होईल. या देशांमध्ये आधीच चेहरा झाकणाऱ्या बुरखा किंवा नकाबवर बंदी आहे.
कायद्यातील महत्वाची माहिती:
या नवीन विधेयकानुसार सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब घातल्यास महिलांना 200 ते 4000 युरो (भारतीय रुपयांत सुमारे 4 लाख) दंड भरावा लागू शकतो.
कोणत्या पक्षाने प्रस्ताव मांडला?
हा प्रस्ताव 'चेगा' या अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाने संसदेत मांडला होता. त्यांचा उद्देश म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणं टाळणं, मग ते धार्मिक कारणांसाठी का असेना.
लोकांच्या प्रतिक्रिया:
या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी याचं समर्थन केलं, तर काहींनी याला लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा निर्णय म्हटलं आहे.
आता पुढे काय?
हे विधेयक आता राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सुसा यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतरच हा कायदा लागू होईल. तसेच, ते पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाकडे तपासणीसाठीही जाऊ शकते.