List of 2026 Amavasya Date List of 2026 Amavasya Date
ताज्या बातम्या

List of 2026 Amavasya Date : येत्या वर्षात किती अमावस्या आहेत जाणून घ्या...

हिंदू धर्मात अमावस्या दिनाला मोठं धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चंद्राचा पूर्णतः अभाव असलेला हा दिवस साधना, आत्मचिंतन आणि मनाची शुद्धी करण्याचा मानला जातो.

Published by : Riddhi Vanne

(List of 2026 Amavasya Date) हिंदू धर्मात अमावस्या दिनाला मोठं धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चंद्राचा पूर्णतः अभाव असलेला हा दिवस साधना, आत्मचिंतन आणि मनाची शुद्धी करण्याचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, अमावस्या पितृ कार्यांसाठी खूप महत्त्वाची असते. या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं. अमावस्येला नकारात्मकतेला दूर करत, नवीन ऊर्जा घेण्याचा दिवस मानला जातो. अनेक लोक या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि दानधर्म करतात. विशेषतः सोमवती, शनिवारी येणारी आणि महालय अमावस्या यांना विशेष महत्त्व असतं. महालय अमावस्या पितृपक्षाचा समारोप दर्शवते आणि देवी पूजनाची सुरुवात देखील याच दिवशी होते.

ग्रामीण भागात अमावस्येला देवी-देवतांची पूजा, व्रते आणि विविध परंपरांचा पालन केला जातो. काही ठिकाणी वृक्षपूजन, दीपदान आणि नदीस्नान देखील केले जातात. वैज्ञानिक दृष्टीनेही, चंद्राच्या अभावामुळे मानवी मनावर परिणाम होतो, त्यामुळे या दिवशी संयम आणि शांतता राखण्याचं महत्व दिलं जातं. अमावस्या ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची, भूतकाळाचा आदर करून भविष्याकडे सकारात्मक पावले टाकण्याची संधी आहे. हिंदू धर्मात, आमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटी येते आणि ती खूप खास मानली जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी पितरांना स्नान, दान, जप आणि तर्पण करणं शुभ मानलं जातं. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सोमवारी आणि शनिवारी अमावस्या येते, तेव्हा तिचं महत्त्व आणखी वाढतं. सोमवारी येणारी अमावस्या "सोम आमावस्या" म्हणून ओळखली जाते, तर शनिवारी येणारी "शनिश्चरी अमावस्या" म्हणून प्रसिद्ध आहे.

आता, 2026 मध्ये, जानेवारी ते डिसेंबरपर्यंत येणाऱ्या आमावस्याच्या तारखा पाहूया:

  • माघ अमावस्या (मौनी अमावस्या) – १८ जानेवारी २०२६

  • फाल्गुन अमावस्या – १७ फेब्रुवारी २०२६

  • चैत्र अमावस्या – १९ मार्च २०२६

  • वैशाख अमावस्या – १७ एप्रिल २०२६

  • ज्येष्ठ अमावस्या – १६ मे २०२६

  • ज्येष्ठ अमावस्या (अधिक) – १५ जून २०२६

  • आषाढ अमावस्या – १४ जुलै २०२६

  • श्रावण अमावस्या – १२ ऑगस्ट २०२६

  • भाद्रपद अमावस्या – १७ सप्टेंबर २०२६

  • अश्विन अमावस्या (सर्व पितृ अमावस्या) – १० ऑक्टोबर २०२६

  • कार्तिक अमावस्या (दिवाळी) – ९ नोव्हेंबर २०२६

  • मार्गशीर्ष अमावस्या – ८ डिसेंबर २०२६

अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान का केलं जातं?

अमावस्येच्या दिवशी चंद्राचा प्रभाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मन, शरीर आणि विचार शुद्ध होतात. तसेच, आमावस्या ही पितरांना श्रद्धांजली देण्याची वेळ असते, म्हणून या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान करून तर्पण आणि पाणी दिल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख, समृद्धी येते.

2026 च्या नवीन वर्षाची सुरुवात पवित्र माघ अमावस्या (मौनी अमावस्या) ने होईल. हे वर्ष विशेष महत्वाचं असणार आहे कारण १८ जानेवारी २०२६ रोजी माघ अमावस्या येईल आणि याच दिवशी प्रयागराजमध्ये शाही स्नानाचे आयोजन होईल. धार्मिक दृष्टिकोनातून, ही तारीख अत्यंत फलदायी मानली जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा