Dr. Nitin Wagh : नाशिकचे साहित्यिक डॉ. नितीन वाघ यांचे अकाली निधन, मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी Dr. Nitin Wagh : नाशिकचे साहित्यिक डॉ. नितीन वाघ यांचे अकाली निधन, मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी
ताज्या बातम्या

Dr. Nitin Wagh : नाशिकचे साहित्यिक डॉ. नितीन वाघ यांचे अकाली निधन, मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी

नाशिक साहित्य: डॉ. नितीन वाघ यांचे अकाली निधन, मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी.

Published by : Riddhi Vanne

Literary Dr. Nitin Wagh passes away : नाशिकचे ख्यातनाम साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासक डॉ. नितीन भरत वाघ (वय 48) यांचे सोमवारी सायंकाळी पणजी, गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, बुद्ध विचारसरणी व आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा एक प्रगल्भ विचारवंत हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डॉ. वाघ यांनी अनेक वर्षे साहित्य आणि समाज यांचा सखोल अभ्यास केला. ‘झेन’ आणि ‘निळावंती’ या त्यांच्या कादंबऱ्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी चित्रपट कथालेखन क्षेत्रातही योगदान दिले. त्यांच्या लेखनाचा गाभा म्हणजे बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नामदेव ढसाळ यांच्या विचारांचा अभ्यास. ‘हिंदू-मुगल सांस्कृतिक समन्वय, औरंगजेब, सन १८५७ नंतर भारताचे मुसलमान’ हे त्यांचे महत्त्वाकांक्षी पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज होते. परंतु वाचकांपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचे अकाली निधन झाल्याने साहित्य रसिकांमध्ये खंत व्यक्त होत आहे.

सावंतवाडीत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्यासोबत पुस्तक प्रकाशनाविषयी चर्चा करत असताना हॉटेलमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना सिंधुदुर्गमधील ओरोस येथे हलवून अँजिओप्लास्टी करण्यात आली. नंतर त्यांना गोव्यातील पणजी येथे नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर कुटुंबीय, साहित्यिक आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मंगळवारी दुपारी नाशिकच्या पंचवटी येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. वाघ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा