ताज्या बातम्या

Liver Damage Causes : फक्त अल्कोहोलच नाही; तर 'हे' पदार्थही ठरू शकतात तुमचं लिव्हर खराब होण्यासाठी कारणीभूत

लिव्हर खराब होण्याची कारणे: दारूसोबत काही पेये लिव्हरला अधिक धोकादायक ठरतात.

Published by : Riddhi Vanne

आपण अनेकदा ऐकत असतो की लिव्हर (यकृत) खराब होण्यामागे मुख्य कारण म्हणजे दारू. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की तुमच्या दैनंदिन आहारातले काही 'नॉन-अल्कोहोलिक' पदार्थ लिव्हरसाठी दारूपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात? काही सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, फ्लेवर्ड पेये आणि बॉटलबंद ज्यूस हे तुमच्या यकृताला हळूहळू पोखरून टाकत असतात, त्याचा अंदाजही तुम्हाला लागत नाही.

लिव्हरचं महत्त्व काय?

लिव्हर हे शरीरातील सर्वांत कार्यक्षम आणि महत्त्वाचं अवयव आहे. ते विषारी घटक फिल्टर करतं, पचन सुधारतं, ऊर्जा साठवतं आणि अनेक महत्त्वाच्या जीवनक्रिया नियंत्रित करतं. पण चुकीच्या आहारामुळे ते कमजोर होतं, चरबीने भरतं आणि अखेर 'फॅटी लिव्हर', 'लिव्हर सिरॉसिस' किंवा इतर गंभीर विकारांना आमंत्रण मिळतं. हे 5 पेये/पदार्थ ठरतात लिव्हरसाठी धोकादायक आहेत.

1. सॉफ्ट ड्रिंक (कोल्ड ड्रिंक, फिजी ड्रिंक्स)

यामध्ये कृत्रिम साखर प्रचंड प्रमाणात असते. ही साखर लिव्हरमध्ये चरबीच्या स्वरूपात साठते. 'नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर' आजाराला चालना देते. नियमित सेवनामुळे लिव्हर सिरॉसिसचा धोका वाढतो.

एनर्जी ड्रिंक्स

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या या ड्रिंक्समध्ये कॅफिन, कृत्रिम स्वादद्रव्यं आणि साखर असते. या गोष्टी लिव्हरवर ताण निर्माण करतात. संशोधनानुसार, सतत एनर्जी ड्रिंक्स घेणाऱ्यांचे लिव्हर एन्झाइम्स असंतुलित होतात, ज्यामुळे लिव्हर निकामी होण्याची शक्यता वाढते.

बाजारातले साखरयुक्त फ्रुट ज्यूस

‘100% Natural’ असं लिहिलेलं असलं तरी हे रस साखर, प्रिझर्व्हेटिव्ह आणि रंगांनी भरलेले असतात. ही साखर लिव्हरला हानी पोहोचवते. त्यामुळे घरगुती ताजे रस पिणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे.

फ्लेवर्ड मिल्क आणि शेक्स

चॉकलेट दूध, स्ट्रॉबेरी शेक, प्रोटीन शेक्स यामध्ये प्रचंड प्रमाणात कृत्रिम साखर व फ्लेवर्स असतात. यामधील कॉर्न सिरपसारखे घटक लिव्हरसाठी अत्यंत अपायकारक आहेत. हे पेये लठ्ठपणा व फॅटी लिव्हर वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

पॅकेज्ड आय टी आणि बाटलीबंद कॉफी

हे पेये ‘हेल्दी’ म्हणून बाजारात विकले जातात, पण यामध्ये साखर व कॅफिन प्रचंड प्रमाणात असतात. हे लिव्हरवर भार टाकतात व लिव्हरच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. दारू टाळणं योग्यच, पण त्याचबरोबर हे ‘दैनंदिन पेये’ही मर्यादित प्रमाणात घ्या. लिव्हर हा ‘सायलेंट फाइटर’ आहे – तो त्रास देत नाही, पण एकदा बिघडलं की त्याचं उपचार करणं कठीण होऊ शकतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज