थोडक्यात
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुटी जाहीर, सरकारी कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येणार.
अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार सरकारी कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद राहतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयीसुविधांचा आढावा शिंदे यांनी घेतला. शुक्रवारी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी मुंबई शहर व उपनगरातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, महानगरपालिकेची कार्यालये बंद राहतील. केंद्र सरकारी, बँका या दिवशी सुरू राहतील. चैत्यभूमी-दादर-वरळी परिसरात दोन दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला आहे