Central Railway Traffic Disrupted : अंबरनाथ–बदलापूर दरम्यान लोकल ठप्प; सकाळच्या गर्दीत प्रवाशांची मोठी गैरसोय Central Railway Traffic Disrupted : अंबरनाथ–बदलापूर दरम्यान लोकल ठप्प; सकाळच्या गर्दीत प्रवाशांची मोठी गैरसोय
ताज्या बातम्या

Central Railway Traffic Disrupted : अंबरनाथ–बदलापूर दरम्यान लोकल ठप्प; सकाळच्या गर्दीत प्रवाशांची मोठी गैरसोय

अंबरनाथ-बदलापूर लोकल ठप्प: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय.

Published by : Riddhi Vanne

Local train stopped between Ambernath-Badlapur : मध्य रेल्वेची ‘लाईफलाईन’ आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली. अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान मालगाडीचे इंजिन सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बिघडल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पहाटेपासून कामावर निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.

मालगाडी थांबल्यामुळे मागोमाग येणाऱ्या लोकल रुळावरच उभ्या राहिल्या. परिणामी कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना 20 ते 25 मिनिटांचा उशीर होऊ लागला. तर अंबरनाथवरून कर्जतकडे धावणाऱ्या लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. अनेक प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले असून, स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने अंबरनाथ, बदलापूर, बडोदा, कर्जतसह अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सकाळच्या पीक अवरमध्ये लोकल ठप्प झाल्याने नोकरदार वर्गाला वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. गर्दीचा रेटा वाढल्याने नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले असून, संतापाचं वातावरण दिसत आहे.

घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही वेळात सेवा पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाने कळवले असले तरी संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे संकेत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Protest : मराठा आरक्षण आंदोलनावरून प्रवीण दरेकरांची तीव्र नाराजी; मनसेचं केलं कौतुक

Nitesh Rane On Manoj Jarange : जरांगे चिचुंद्री म्हणाले, "पण मी हिंदुत्वाचं काम करत राहीन"

Chitra Wagh on Supriya Sule : "मोठ्या ताई तु इधर-उधर की बात...", कालच्या भेटीवरुन चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Manoj Jarange Protest : मराठा–ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय; भुजबळांचा जरांगेंवर घणाघाती हल्ला