मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याची माहिची सुत्रांनी दिली आहे.पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान असणार आहे. पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय याचा विचार केला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचार केला जाणार आहे. ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीची बैठक आहे. महायुतीच्या बैठकीआधी आज राष्ट्रवादीची बैठक संपन्न होणार आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. अंबाला भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अंबाला भागातील गावांमध्ये 9 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजता शेतकरी दिल्लीसाठी कुच करणार आहेत. हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत
प्रसाद लाड आणि अंबादास दानवेंमध्ये गळाभेट झाली आहे. अंबादास दानवे माझे मित्र असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. यानिमित्तानं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं आहे.
मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टीमेटम देण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा काढा असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. सरकारला शुभेच्छा देत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी 8 डिसेंबरला अर्ज भरता येणार आहे. भाजपकडून 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार? की नवा अध्यक्ष निवडला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या अधिकृत पेजवरुन शिवसेना ठाकरेंना फॉलो केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मशाल चिन्हाच्या फेसबुक पेजला फॉलो केलं आहे.
पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ विधी होणार असल्याने भाजपाचे नालासोपारा चे आमदार राजन नाईक भावूक झाले आहेत. पहिल्यांदा शपथ घेताना माझ्या मनात विरार नालासोपारा ची जनता असेल, ईश्वर साक्ष शपथ घेईल आणि याठिकानच्या जनतेला निश्चित न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन ही त्यांनी दिले आहे.
वर्षा निवास्थनावरील मुख्यमंत्री नाव झाकले आहे. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री नाव झकण्यात आले असून अद्याप एकनाथ शिंदे यांचे वर्षा बंगल्यावर वास्तव्य आहे. त्यामुळे नाव वगळता केवळ मुख्यमंत्री पाटी झाकण्यात आली.
पुणे पालकमंत्रीपदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवारांच्या नावासाठी आग्रही तर भाजप पदाधिकाऱ्यांनाही पालकमंत्रीपद मिळण्याची आशा आहे.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिचड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्रेन स्ट्रोकमुळे दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक आहे.
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिचड त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकमुळे दोन महिन्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सागर निवासस्थानी धनंजय मुंडे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.
काँग्रेस नेते राहुल गांधी सोलापुरातील मारकडवाडीत येणार आहेत. राहुल गांधी ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवरील मतदानावर आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.
अल्लू अर्जुनने नवा विक्रम रचला आहे. पुष्पा 2 च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 68 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विनोद कांबळींना मदत करण्याची कपिल देव यांनी जबाबदारी घेतली आहे. कपिल देव विनोद कांबळींना मदत करणार आहेत. विनोद कांबळीनं पुनर्वसन केंद्रात जाऊन उपचार घेण्याची अट ठेवण्यात आली आहे. विनोद कांबळींच्या मदतीसाठी कपिल देव सरसावले आहेत.