लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडणार आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
काय आहे राज्यातील दिग्गज नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हीजन? 2030 साली कसा असेल महाराष्ट्र? तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय आहे दिग्गज नेत्यांचं नियोजन? या विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे.