ताज्या बातम्या

'लोकशाही मराठी'चा आज 'लोकशाही संवाद 2025'; दिग्गज नेत्यांची हजेरी

विशेष कार्यक्रम: लोकशाही संवाद 2025, महाराष्ट्रातील नामवंत पाहुण्यांसह विविध विषयांवर चर्चा.

Published by : Prachi Nate

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2025' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर द ऑर्किड इंरित, मुंबई पुणे हायवे, बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ पणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार रोहित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्त्या एनसीपी रुपाली पाटील, उपसभापती, विधानपरिषद डॉ. नीलमताई गो-हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त. पुणे अमितेश कुमार, आमदार हेमंत रासने, माजी आमदार रविंद्र धंगेकर, उत्य आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा. विनय कुमार चौबे, उपनेत्या शिवसेना सुषमा अंधारे, अभिनेत्री, लेखिका सोनाली कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

'लोकशाही संवाद 2025' या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही आज सकाळी 9 वाजल्यापासून लोकशाही मराठी न्यूज चॅनलसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहु शकता. लोकशाही युट्युब चॅनेलवर हा कार्यक्रम दिवसभर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा