छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
मराठवाड्याच्या विकासासाठी आणि मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील यावरही सविस्तर राज्यासमोर माहिती मांडली जाणार आहे. मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं व्हिजन काय आहे? मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा आहे, हे जाणून घेतलं जाणार आहे. या कार्यक्रमाला सकाळी 9.50 पासून सुरवात होणार आहे.
या कार्यक्रमाला अंबादास दानवे, अशोकराव चव्हाण, अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार बजरंग सोनवणे, सुरेश धस, भागवत कराड, इम्तियाज जलिल उपस्थित राहणार आहेत.