आज 'लोकशाही मराठी' चॅनेलतर्फे 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' सोहळा नुकताच पार पडला. मराठवाड्यामधील रत्नांचा सन्मान केला गेला. यावेळी मराठी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मंगेश देसाईदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पादेखील झाल्या. यावेळी मंगेश देसाई यांनी धर्मवीर आनंद शिंदे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दलचा किस्सादेखील शेअर केला.
मंगेश देसाई यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट तयार केला. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळाली. या चित्रपटाचे आजवर दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांचा संपूर्ण जीवनपट बघायला मिळाला होता. आशातच आता मंगेश देसाई नवीन चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमादरम्यान केली.
मंगेश देसाई आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा 'गुवाहाटी फाइल्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांचे प्लॅनिंग आता सुरु आहे. 2028 साली या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती सांगितली जाईल. त्याआधी खूप लोक टीकादेखील करतील. राजकीय चित्रपट काढण्यावरुन बोलतील. मात्र एकनाथ शिंदे यांचा खूप पाठिंबा मिळाला आहे. "त्याचप्रमाणे आता मी केवळ राजकीय चित्रपट न करता आता ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. महदजी शिंदे यांच्यावर चित्रपट बनवणार आहे", अशी घोषणादेखील मंगेश देसाई यांनी केली.